तो व्हिडिओ व्हायरल अन उठले राजकीय वादळ, -मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वादग्रस्त वक्तवय.

24 प्राईम न्युज 14 Sep 2023 मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे, असे ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आरक्षणाविषयीच्या बैठकीत झालेल्या
निर्णयाची माहिती देताना ‘बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं,’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्याचे या व्हिडीओमध्ये केल्याचे दिसून आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, शासनाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चांगली भूमिका घेतली असतांना काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘बोलून मोकळंमराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे, असे ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आरक्षणाविषयीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना ‘बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं,’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्याचे या व्हिडीओमध्ये केल्याचे
दिसून आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, शासनाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चांगली भूमिका घेतली असतांना काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘बोलून मोकळंव्हायचं अन् निघून जायचं’ अशा आशयाचं वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वक्तव्यावर मनोज जरांगेपाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ खरा असल तर त्यांना महागात पडेल, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. खासदार ओमराजे निंबाळकर, सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.