हा निव्वळ खोडसाळपणा – मुख्यमंत्री.

24 प्राईम न्यूज 14 Sep 2023
| व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या सवादाचा चुकीच्या पध्दतीने व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावरून व्हायरल करणे, हे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यादाच अशा सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असताना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निदनीय आहे. ‘