डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्याने निवेदनाद्वारे केली आहे.

अमळनेर शिवारात डुकरांच्या रोजच्या उपद्रवाने मका पिकाचे नुकसान…
अमळनेर(प्रतिनिधि) शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या शेतात डुकरांच्या रोजच्या उपद्रवाने मका पिकाचे नुकसान झाले असून त्रासलेल्या शेतकऱ्याने तहसीलदार, व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सत्येन संदानशिव यांची पारोळा रस्त्यालगत शेती असून त्यात मका पिकाची लागवड केली आहे. मात्र या भागात डुकरे सतत शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत असतात. गेल्या आठवड्यापासून मका पिकाचे रोजच नुकसान होत असल्याने सदर नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा व या डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्याने निवेदनाद्वारे केली आहे. सततच्या ह्या नुकसानीमुळे कंटाळलो असून याबाबत काही कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे.