अनंत चतुर्दशी आणि पैगंबर मुहम्मद यांची जयंती निमित्त शांतता सभेचे आयोजन.

अमळनेर( प्रतिनिधि)प्रत्येक धर्म शांतता आणि बंधुभावाची शिकवण देतो आपण सर्व समान आहोत असा आपला विश्वास आहे. आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक विजय शिंदे म्हणाले की, कोणी कितीही दंगल भडकवण्याचा कट आखला तरी आपण भारताचे सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य बजावले पाहिजे, कारण येथील प्रत्येक नागरिकाला दंगल नको, शांतता हवी आहे. गणेशोत्सवाची सुरुवात म्हणजेच एकाच दिवशी असल्याने कोणत्याही प्रकारची परिस्थिती उद्भवू नये म्हणून गांधीपुरा येथे धार्मिक एकता व सामाजिक सलोखा शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हाजी शेखा मिस्त्री, हाजी नसीर, दब्बिर पठान, ऍड.शकील काझी,राजू शेख, रियाज मौलाना,रियाजशैख,कुदरत सेठ, इकबाल शेख, अफसर खा,आदी उपसथित होते उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करीत सण शांततेत साजरा करण्याचे सांगितले एकमेकांच्या धर्माबाबत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस ठाण्यात बैठक बोलावण्यात आली होती.