एरंडोल नगरपालिकेची पर्यावरण पूरक गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न वर्ष 3 रे.

एरंडोल ( प्रतिनिधि )
एरंडोल नगर परिषद तर्फे सलग 3 रे वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव 2023 साजरा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून नपा ने शाडू माती पासुन गणेशमूर्ती तयार

करण्याचे प्रशिक्षण शहरातील विद्यार्थांना व नागरिकांना कार्यशाळे मार्फत देण्यात आले.यामध्ये एकूण 225 जणांनी सहभाग नोंदवून 225 शाडू माती मूर्ती तयार करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मूर्तिकार श्री शिवम सोनवणे यांनी विद्यार्थांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्या बाबत मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत रोप देवून करण्यात आली.मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण जळगांव चे प्रशिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.शिवम सोनवणे यांनी दिले. एरंडोल नगर परिषद चे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.विकास नवाळे यांनी स्वतः शाडू माती मूर्ती तयार करून त्याची स्थापना घरी करण्याचा निश्चय केला. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात एरंडोल न.पा. देखील पर्यावरणपूरक गणेश मुर्ती ची स्थापना करून विसर्जन देखील पर्यावरणपूरक पद्धतीनेच करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाचे महत्व विषद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.