१४ वर्षा आतील शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा
मुलांमध्ये ताप्ती भुसावळ तर मुलींमध्ये रुस्तमजी जळगाव विजयी.

जळगाव ( प्रतिनिधी )
जिल्हास्तरीय आंतर शालेय १४ वर्षा आतील मुले आणि मुलींच्या स्पर्धा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आले असून त्यात मुलां मध्ये ताप्
ती पब्लिक स्कूल भुसावळ विजयी व शानबाग हायस्कूल जळगाव उपविजयी ठरली.
मुलींमध्ये जळगावची रुस्तमजी हायस्कूल विजयी तर पाचोरा ची बुरहानी उप विजयी ठरली.

विजयी व उप विजयी संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस तर्फे चषक देण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नुकतेच १४ वर्षातील गटात जळगाव मधून निवड होऊन महाराष्ट्र राज्यातर्फे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू अथर्व तिवारी व संस्कृती मेढे तसेच मुलींना एकलव्य पुरस्कार प्राप्त खेळाडू कांचन चौधरी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.
गुरुवारी १७ वर्षा आतील मुलांच्या व शुक्रवारी मुलींच्या फुटबॉल स्पर्धा होणार आहे.
पंच
स्पर्धा यशस्वी साठी फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख व क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे यांच्या मार्गदर्शन खाली संघटनेचे सहसचिव व जैन स्पोर्ट्सअकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्वात आकाश धनगर, सुरज सपके,कुलदीप पाटील,कौशल पवार,आयन शेख,अर्शद शेख, निरज पाटील,संजय कासदेकर, दीपक सस्ते,वसिम शेख, सिद्धू अडकमोल हे परिश्रम घेत आहे
स्पर्धेचा निकाल- मुले
१. ताप्ती पब्लिक भुसावल वि.वि पोद्दार इंटरनॅशनल यावल
१-०
२. शानबाग जळगाव वि.वि लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव
४-०
३. विवेकानंद विद्यालय चोपडा वि.वि एकनाथराव टॅलेंट स्कूल मुक्ताईनगर
२-०
४. सेंट जोसेफ चाळीसगाव वि.वि सेंट मेरी एरंडोल
१-०
५. लोर्ड गणेशा जामनेर वि.वि निर्मल स्कूल पाचोरा
३-०
६. ताप्ती पब्लिक भुसावल वि.वि सेंड मेरी अमळनेर
१-०(पेनल्टी )
७. शानबाग जळगाव वि.वि विवेकानंद चोपडा
२-०
८. ताप्ती पब्लिक भुसावल वि.वि सेंट जोसेफ चाळीसगाव
३-०
९ शानबाग जळगाव वी वी गणेशा जामनेर ५-३ पेनल्टी
१० ताप्ती भुसावळ वी वी शानबाग जळगाव १-०
मुली
१) बुरहानी पाचोरा वी वी डॉ उल्हास पाटील भुसावळ २-१
२) रुस्तमजी जळगाव वी वी काका साहेब पुर्णपात्रे ४०गाव २-१
३) रुस्तमजि वी वी बुरहानी पाचोरा २-१
फोटो
विजयी व उप विजयी संघ सोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून कुलकर्णी, मीनल थोरात,कांचन चौधरी,फारुक शेख,नरेंद्र सर आदी दिसत आहे