अमळनेर येथे जम्मूत हौतात्म्य पत्करलेल्या
शहीदांना श्रद्धांजली अर्पण.

अमळनेर ( प्रतिनिधि )
कर्नल मनप्रीत सिंग,मेजर आशिष धौनैक,डी एस पी हुमायूं भट्ट,राइफलमैन रवि कुमार हे शहीद झालेत.या सर्व शूर वीरांना गांधलीपुरा अमळनेर येथील अल्लामा फजले हक़ खैराबादी स्टडी सेन्टर आणि पब्लिक लाइब्रेरी येथे तातडीने श्रद्धांजली सभा घेण्यात

आली.शूर वीरांच्या प्रतिमांना फुले वाहून, मेणबत्ती लावून आणि स्तब्धता पाळून गंभीरपणे श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रसंगी प्रा अशोक पवार यांनी उपस्थितांना शहिदांच्या कार्याविषयी माहिती विशद केली आणि आपल्या कर्तव्याविषयीची वाढलेली जबाबदारी सुद्धा स्पष्टपणे सांगितली.स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्ररी चे अध्यक्ष- रियाज़ शेख, संदीप घोरपडे,बन्सीलाल भागवत,एस एम आण्णा पाटील, भाऊसाहेब देशमुख, गौतम मोरे,अ.रज़्ज़ाक शेख,
इत्यादींनी हौतात्म्य पत्करलेल्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्यात.
यावेळी के डी पाटील, दर्शना पवार,जहूर मुतवल्ली, अश्पाक शेख,अ. कादीर अली,अहतेशाम भाई,मुन्नाभाई, शफी भाई, मुशताक बागवान,अ.वाहेद,राजु शेख,युसुफ़ पेंटर,सुलतान,सईद शेख, सफदर दादा इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.