शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन…

0

अमळनेर ( प्रतिनिधि )

अमळनेर येथील शांतता समितीच्या सभेत बोलताना म्हणाले की उत्सवात डॉकटर,वकील,प्रोफेसर,यानी सहभाग घ्यावा कारण आपल्या भागातील तरुणाचा या लोकांशी सम्बंध येत असतो ह्या लोकांच्या उपस्थितीने तरुण आदर करतील व विपरीत प्रकार करणार

नाही आपल्या घरातील महिला उत्सवात सहभागी होत नाही असुरक्षिततेमुळे महिलांना भीती वाटते. त्याला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे निर्विघ्नपणे शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी अमळनेर येथील वाणी मंगल कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.या बैठकीला सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाचे पंच मौलवी , तसेच पोलिस पाटील,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, तिलोत्तमा पाटील, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, प्रांताधिकारी महादेव खेडकर, पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजल पाटील, मारवडचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, सरकारी वकील अॅड. शशिकांत पाटील उपस्थित होते संजय पाटील यांनी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे शिस्तीत व कायद्यात विसर्जन करणाऱ्या मंडळांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करू असे जाहीर केले. सूत्रसंचालन शरद पाटील व आभार डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!