मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार – संजय राऊत

24 प्राईम न्यूज 16 Sep 2023
राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी संभाजीनगर येथे होणार आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर आम्हीही संवाद साधणार आहोत. तुम्ही किती खोट बोलता हे मला ऐकायचे आहे. आम्हाला संधी मिळाली तर मी देखील पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहे. कारण मी देखील पत्रकार आहे. पोलिसांनी अडवले नाही तर पत्रकार परिषदेला निश्चित जाऊ, असे ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत खरोखरच पत्रकार परिषदेला उपस्थित राहायला गेले तर सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.