पडळकरांची हकालपट्टी करा!
राष्ट्रवादीची मागणी, कार्यकत्यांनी नेत्यांचा सन्मान राखावा. फडणवीस

24 प्राईम न्यूज 20 Sep 2023 गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, असे म्हटले आहे. दरम्यान, भाजपने गोपीचंद पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने केली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर अजित पवार गटाकडून पडळकर यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
पडळकर यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठीकाणी निषेध केला.