अमळनेर शहरतील या भागातील पाणीपुरवठा दोन दिवस ऊशिरा.

अमळनेर( प्रतिनिधि)शहरातील झामी चौक भागातील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईप लाईन बायपास जोडण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले असल्याने शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार आहे.
पैलाड ,भोईवाडा ,झामी चौक , पानखिडकी ,साळी वाडा ,माळी वाडा ,पाठक गल्ली,शिरूडनाका ,बालाजीपुरा , पटवारी कॉलनी , दत्त हाऊसिंग सोसायटी ,तांबेपुरा , सानेनगर , न्यू प्लॉट ,मुंबई गल्ली ,मेहतर कॉलनी ,गांधलीपुरा , ढेकू रोड ,पिंपळे रोड (कोर्ट टाकीवरील भाग)आदी भागातील पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आह.