शास्त्री महाविद्यालयांत गणरायाचे जल्लोषात स्वागत..

एरंडोल (कुंदन ठाकुर)मंगळवार रोजी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी , एरंडोल जि. जळगाव या महाविदयालयात दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थी निमित्त श्री. गणरायाचे वाद्यवृंदाच्या सुरात वाजत गाजत आगमन झाले. श्री गणेशाची आरती व दिपप्रज्वलन महाविद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ विजय शास्त्री व महाविद्यालयाच्या सचिव सौ . रूपा शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी व्यसन मुक्ती, लैंगिक शोषण, सोशल मीडिया चा दुरुपयोग कुटुंब नियोजन अशा वेगवेळ्या विषयांवर पथनाट्य सादर केले, या सोबत विद्यार्थ्यांकडून लेझीम रॅली ने मिरवणूकीच्या शोभा वाढविली. तर दुसऱ्या दिवशी महाविद्यालयांत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या व त्यामध्ये अनेक विध्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेतला. यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी मान्यता दिल्या बद्दल मा- डॉ पराग कुलकर्णी यांनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थ्यानी आभार व्यक्त केले. गणेशोस्तवाच्या उत्सवासाठी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याचे सहकार्य लाभले असे कॉलेज चे पि आर ओ शेखर बुंदेले यांनी कळविले.