जिल्हास्तरीय मनपा फुटबॉल स्पर्धेला शानदार सुरुवात.
-खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवावे – -रियाझ बागवान.

⚽⚽⚽⚽⚽⚽
जळगाव ( प्रतिनिधी)जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत आंतरशालेय मनापा जिल्हास्तर १४ वर्षातील फुटबॉल स्पर्धेला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा

संकुल येथे सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा एमआयएम पक्षाचे गटनेते रियाझ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून खेळासाठी प्रोत्साहित केले.
या वेळी फुटबॉल असो चे सचिव फारुक शेख,वैद्यकीय अधिकारी डॉ फारुक साबीर यांची विशेष उपस्थिती होती.
१४ वर्षे मुलांच्या संघात एकूण २० संघांचा सहभाग असून या स्पर्धा दोन दिवस चालणार आहे.
स्पर्धेचा निकाल
१)सेंट लॉरेन्स विजयी रायसोनी मराठी
२)ओरियन स्टेट विजय उज्वल
३) मिलत विजय अभिनव ४)अँग्लो विजय आर आर ५)सेंट जोसेफ विजय मिललत हायस्कूल
६ पोद्दार विजय ईकरा शाहीन ७)गोदावरी विजयी सेंट लॉरेन्स
८) ओरियन सीबीएससी विजय ओरियन स्टेट
९) एल एच पाटील विजयी ए टी झांबरे
१०) अँग्लो उर्दू विजय रोज लँड
११)सेंट टेरेसा विजयी विद्या इंग्लिश
१२) इकरा सालार नगर विजयी रायसोनी इंग्लिश
१३ सेंट जोसेफ विजय गोदावरी इंग्लिश.