‘पहिले धनगर नंतर आमदार’
गोपीचंद पडळकर यांचा भाजपला इशारा.

0

24 प्राईम न्यूज 21 Sep 2023 धनगर आरक्षणासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबाला अंगावर घेणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर,’ अशी पोस्ट करत पडळकर यांनी एकप्रकारे भाजपलाही इशारा दिला आहे धनगर आरक्षणाच्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. विशेषत सत्ताधारी अजित पवार गटाने पडळकरांच्या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त करत जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली.यावादावर भाष्य करताना स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत सबुरीचा सल्ला दिला या वादात आज स्वतः पडळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इशारा दिला. ‘मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर, नाद करू नका यळकोट यळकोट, जय मल्हार !’ असे म्हणत पडळकर यांनी एकप्रकारे भाजप नेतृत्वाला इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!