सर्वोदय गणेश मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

प्रतिनिधी (कुंदन ठाकुर) एरंडोल येथील सर्वोदय गणेश मंडळ व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश उत्सव निमित्त व ३५० व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल पाटील,पोलीस निरीक्षक सतिष गोराडे,पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी सुमारे २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना योग्य मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांनी केले.अशा प्रकारे सर्व गणपती मंडळांनी असा उपक्रम राबवावा असे उपस्थित मान्यवरांनी गौवोद्गार काढले.सदर उपक्रमाला डॉ.जान्हवी,गोदावरी फाऊंडेशन चे डॉ. गजानन पाटील,डॉ.मोहित,डॉ.ज्ञानेश्वर ,डॉ.गौरी,डॉ. संदिप नरवाडे,डॉ.दिपाली तथा विशाल शेजवळ जनसंपर्क अधिकारी यांचे सहकार्य लाभले.