आकांक्षा पाटील बी ए एम एस उत्तीर्ण.

एरंडोल ( कुंदन ठाकुर)धरणगाव_ कल्याने होळ तालुका धरणगाव येथील आकांक्षा अजेंद्र पाटील ही विद्यार्थिनी एल एन सी टी महाविद्यालय भोपाल येथून बी ए एम एस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले डॉ.आकांक्षा ही एरंडोल येथील उमेद कन्स्ट्रक्शन व लक्ष्मीनारायण ट्रेडर्स चे संचालक अजेंद्र पाटील यांची कन्या आहे प्रचंड जिद्द ,मेहनत आणि कठोर परिश्रमाचे हे यश आहे .मुलगी असूनही बाहेर राज्यात शिक्षणासाठी पाठवण्याची आई-वडिलांची मानसिक तयारी आणि मार्गदर्शन मोलाचे होते आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना असल्याचे डॉ. आकांक्षा सांगते .तिच्या या यशाबद्दल कुटुंबियांसह, मंगलमूर्ती बिल्डर्स चे संचालक एस आर पाटील (नालासोपारा), कल्याने होळ चे सरपंच रमेश पाटील ,धरणगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष डी एस पाटील, आनंद सिंह राजपूत (नवी मुंबई), चंदन सिंह पाटील (वरणगाव), बापू पाटील,डॉ राहुल पाटील,डॉ स्नेहल पाटील,विलास पाटील (बुलढाणा),शरद पाटील (यावल) आदींनी अभिनंदन केले.कल्याने होळ सह एरंडोल येथील अजेंद्र पाटील यांच्या मित्र परिवार ,नातेवाईक ,आप्तेष्ट यांच्याकडून डॉ आकांक्षा चे अभिनंदन होत आहे.