दसरा मेळाव्यावरून पुन्हा संघर्ष शिवाजी पार्कसाठी दोन्ही शिवसेनेकडून अर्ज.

24 प्राईम न्यूज 30 Sep 2023
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी दोन दसरा मेळावे पार पडले. यंदाही
दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या
शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज
दाखल झाले आहेत. ज्या पक्षाचा अर्ज पहिला त्या
पक्षाचा आवाज शिवाजी पार्क मैदानात घुमणार
आहे, मात्र कुठल्या पक्षाने आधी अर्ज दिला,
याबाबत पालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागाने मौन
बाळगणेच पसंत केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई होणार की पालिका
आपल्या अधिकारात परवानगी देणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गेल्या ४० वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करत आहे.