राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा मनसे लढवणार. राज ठाकरे

24 प्राईम न्यूज 3 Oct 2023 राज्यातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीसोबत मनसेही जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता त्यावर पडदा पडला आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा मनसेने केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे विविध नेते विविध लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. त्यांनी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यासाठी आजची बैठक घेतली होती. राज्यात पक्षाची ताकद वाढली आहे, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली.
पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कामगिरीचा आढावा मतदारसंघानुसार घेतला आहे. स्वबळावर निवडणूका लढवण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. सोमवारी झालेली बैठक ही तयारीचाच एक भाग आहे. तळागाळात पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोणत्या आघाडीत किंवा युतीत समाविष्ट व्हायचे याचा पूर्ण अधिकार पक्षाने पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहेत, असे सरदेसाई म्हणाले. मनसेचे आणखी नेते अभिजीत पानसे म्हणाले की, राज्यातील जनता राज ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहे