जिल्हा व अति. सत्र न्यायालय अमळनेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तालुका विधी सेवा समिती अमळनेर व वकील संघ अमळनेर येथे साजरी.

अमळनेर ,(प्रतिनिधि) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे मा.ना. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी सूचित केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा व अति. सत्र न्यायालय अमळनेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तालुका विधी सेवा समिती अमळनेर व वकील संघ अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा न्यायाधिश – १, अमळनेर यांचे न्यायदान कक्षात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. जिल्हा न्यायाधीश -१ श्री एस. बी. गायधनी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर, श्री पी पी देशपांडे,
सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्री एन आर येलमाणे,
२ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीमती एस एस जोंधळे
३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीमती ए यु यादव
तसेच वकील संघाचे अध्यक्ष श्री डी पी परमार, उपाध्यक्ष श्री अमजद खान, सरकारी वकील श्री किशोर बागुल, वकील संघाचे वरीष्ठ वकील श्री ए के बाविस्कर, वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेन्द्र निकम, वकील यांनी केले
सदर कार्यक्रमा नंतर मा.ना. उच्च न्यायालय, मुम्बई यांचे निर्देशप्रमाणे सर्व न्यायिक अधिकारी, सरकारी वकील, अमळनेर वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी न्यायालय आवराची साफसफाई करून स्वचछता श्रमदान मोहीम राबविण्यात आली.