इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचे नोबेल..

24 प्राईम न्यूज 7 Oct 2023 न्यूयॉर्क इराणच्या महिलांवर होणारे अत्याचार आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या ५१ वर्षीय नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या त्या १९व्या महिला आहेत. सरकारविरोधात अपप्रचार केल्याच्या आरोपावरून इराणने त्यांना ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ कोडे मारण्याची शिक्षा सुनावली असून त्या सध्या तुरुंगातच आहेत.