सळो की पळो करून सोडू
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपला इशारा..

24 प्राईम न्यूज 7 Oct 2023 हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजप देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही आणि देशातील एकता तसेच अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी भाजपच्या हुकूमशाही व्यवस्थेच्याविरोधात जनतेत जागृती आणि विश्वास निर्माण केला. त्यामुळे राहुल गांधींची वाढती लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची रावणप्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली आहे, पण राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करुनसोडू’, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपला दिला.