अमळनेर येथील पाणी पुरवठा एक दिवस ऊशिरा.

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर येथील जळोद पंपगृहाच्या ठिकाणी चेकर प्लेट बदलविण्याचे आणि जळोद ते अंबारुषी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रा पर्यन्तची पाण्याचे पाईप लाईन वरील एअर व्हाल पाईपे बदलविण्याचे कामे शनिवार दिनांक 7 रोजी महाराष्ट्र वीज वितरण कं. मर्या यांच्या कडील वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात बंद असल्याने सदरचे कामे युद्ध पातळीवर नगरपरिषदेने हाती घेतलेले आहे. सदर काम करणेकामी शनिवार दिनांक 7 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वा. पर्यंत पाणी उपसा यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील होणा-या पिण्याचे पाण्याचे वितरण एक दिवस उशिराने होईल यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.