शहरातील मुलभूत समस्यांमुळे त्रस्त नागरिक सोमवारी पालिकेवर धडकणार.

0

महाविकास आघाडी व त्रस्त नागरिक आघाडी करणार नेतृत्व

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात अनेक वर्षांपासून भुयारी गटारीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे चांगल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. यासह विविध मुलभूत समस्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना समाेरे जावे लागत आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडी व त्रस्त नागरिक आघाडीतर्फे नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील भुयारी गटारीचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडला आहे. त्यामुळे जनतेला खराब रस्त्यामुळे अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. अनेक दिवसांपासून निवडणुका नसल्याने नगरसेवकां अभावी एकट्या मुख्याधिकारीची मनमानी सुरू आहे. त्यांचे मूलभूत नागरी सुविधांकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. गावांत डुकरे, कुत्रे ह्यांचा सुळसुळाट आहे. उघड्यावर मास, मच्छी विकली जाते. अनेक कॉलनींमध्ये दिवाबत्ती गुल असते. तापी नदीमध्ये महापूर असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो. पाणी सोडण्याच्या वेळेचे नियोजन नाही आहे. अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडी व त्रस्त नागरिक आघाडीतर्फे सोमवार दि. ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहापासून सकाळी ११ वाजता नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, नागरी समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्याम पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख सूरज परदेशी, आपचे अध्यक्ष संतोष पाटील, बीआरएसचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!