एरंडोल येथील सेवानिवृत्त गट सचिव निंबा पुंडलिक कुंभार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान..

एरंडोल/कुंदन ठाकुर
एरंडोल येथील गुरुकुल कॉलनी मधील रहिवासी तथा सेवानिवृत्त गट सचिव निंबा पुंडलिक कुंभार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथील अल्पबचत भवनात राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे समारंभ पूर्वक सदर पुरस्कार निंबा पुंडलिक कुंभार यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निंबा कुंभार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर महेंद्र काबरा पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
सध्या ते सोनवत येथील कुंभार काम औद्योगिक सहकारी संस्थेचे कामकाज विनाशुल्क यशस्वीपणे सांभाळतआहेत. तसेच हिंगोना बुद्रुक शासन मान्य वाचनालय अध्यक्षपदाचे धुरा ते सांभाळत आहेत.