शाहरूख खानला वाय प्लस सुरक्षा.

24 प्राईम न्यूज 9 Oct 2023 बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानला महाराष्ट्र सरकारने वाय प्लस सुरक्षा व्यवस्था दिली आहे. कोणतीही अनुचित दुर्घटना टाळण्यासाठी राज्य पोलिसांनी, वायरलेस कम्युनिकेशनद्वारे, महाराष्ट्रातील सर्व आयुक्तालये आणि जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत की, शाहरूख जिथे जिथे प्रवास करतो तिथे त्याला वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा प्रदान करावी. सूत्रांनी सांगितले की, उच्चस्तरीय समितीने त्याच्या सुरक्षेचा अभ्यास केला. त्यानंतर राज्य पोलिसांनी त्याला’वाय प्लस’ सुरक्षा देण्याचे आदेश दिले. खान याचा नुकताच ‘जवान’
हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून मोठा वाद झाला होता. उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी दीपिका पदुकोन हिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी शाहरूखला अनेक उजव्या संघटनांकडून धमक्या आल्या होत्या. पोलिसांच्या सूत्रानुसार, खान याला सहा प्रशिक्षित कमांडोंचे संरक्षण असेल, तर त्याच्या घरी सशस्त्र चार पोलीस अधिकारी तैनात असतील. शाहरूख खानच्या जीवाला धोका लक्षात घेऊन सुरक्षा समितीने त्याला व्यापक सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला.