नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारा विरुद्ध त्रस्त नागरिकांचा यलगार

अमळनेर ( प्रतिनिधि ) येथील नगरपरिषदे वर शहरातील त्रस्त नागरिकांचा मोर्चा काल सोमवार दि 9 रोजी काढण्यात आला.मोर्चा पालिकेच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे घोषणाबाजीतुन विविध आरोप होऊन मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र विकास आघाडी व त्रस्त नागरिकांच्या आघाडीकडून सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चास मोठा प्रतिसाद न मिळता मोजकेच लोक सहभागी झाले होते.माजी आ. डॉ बी एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकातून मोर्चास सुरुवात झाली.बस स्टॅण्ड बाजारपेठ मार्गे सदर मोर्चा पालिकेवर धडल्यानंतर येथे घोषणाबाजी सुरू झाली,यावेळी माजी आ डॉ बी एस पाटील यांनी सुरवातीला मंत्री अनिल पाटील यांना लक्ष करीत त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नसून त्यांचे शहराकडे लक्ष नसल्याचा आरोप केला तसेच पालिकेत निवेदन आणि तक्रारींची दखल घेतली जात नाही,गल्लोगल्ली उघड्यावर मास विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत,गरज नसेल तिथे योजना दिल्या जात आहेत,जनतेच्या उपस्थितीत कोणत्याही मिटिंग घेतल्या जात नाहीत,येथील राजकारणी शंड होत चालले असून सत्ताधारी कोण?आणि विरोधक कोण?हेच समजत नाही असा उपरोधक टोला त्यांनी लगावला.याशिवाय माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,सेनेचे अनंत निकम व रणजित शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून विविध आरोप केले.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी खाली येऊन मोर्चाला सामोरे जात भुयारी गटारीचे काम जीवन प्राधिकरण कडे असून 50 टक्केच्या वर काम पूर्ण झाले आहे,काही त्रुटी असतील त्या पूर्ण करून या कामास वेग देण्यासाठी पाठपुरावा करणार,नव्या रस्त्यांचीही कामे लवकरच सुरू होतील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही कामकाज पाहत असून मोर्चेकऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्या लवकरच मार्गी लावू असे अश्वासन त्यांनी दिले.यावर डॉ बी एस पाटील यांनी चार महिन्यात हे प्रश्न सोडविले न गेल्यास उपोषणाचा पवित्रा घेणार असा इशारा दिला.
यावेळी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की अमळनेर शहरात अनेक वर्षांपासून भुयारी गटारीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे चांगल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे जनतेला खराब रस्त्यामुळे अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. मूलभूत नागरी सुविधांकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. गावांत डुकरे, कुत्रे ह्यांचा सुळसुळाट आहे. उघड्यावर मास, मच्छी विकली जाते. अनेक कॉलनी मध्ये दिवाबत्ती गुल असते. तापी नदी मध्ये महापूर असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो.पाणी सोडण्याच्या वेळेचे नियोजन नाही तरी हे प्रश्न लवकर सोडवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या प्रदेश समन्वयक साई रिता बाविस्कर,सेना तालुका प्रमुख श्रीकांत पाटील,आपचे अध्यक्ष संतोष पाटील, बीआरएस चे अध्यक्ष शिवाजी पाटील,प्रा अशोक पवार,प्रविण जैन,शिवसेना महिला आघाडीच्या श्रीमती मनीषा परब,धनगर पाटील,विजय पाटील,जाकीर शेख,रियाज मौलाना,लतीफ मिस्तरी,रफिक शेख,बन्सीलाल भागवत,दीपिका शिंदे,शांताराम पाटील,महेश पाटील,रामराव पवार,सचिन वाघ,ताहेर शेख,मुशीर शेख,बाळासाहेब पाटील,प्रविण देशमुख उपस्थित होते.