राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. -मुख्यमंत्रीच्या आश्वासनामुळे अमळनेर तालुका राजपुत एकता मंचचे लाक्षणिक उपोषण स्थगित.

अमळनेर/प्रतिनिधि
अमळनेर राजपूत भामटा जातीच्या प्रमाणपत्रासाठी अमळनेर तालुका राजपुत एकता मंचने सोमवार दि 9 रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता,मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे सदर उपोषण स्थगित करण्यात आले.
यासंदर्भात अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना समाजबांधवांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले,यात म्हटले आहे की राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जळगाव येथे सुरू असलेल्या राजपूत समाज बांधवांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही अमळनेर तालुका राजपूत ऐकता मंचतर्फे दि 9 रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु मा. मुख्यमंत्री सो. यांनी दिलेल्या आश्वासनामुळे जळगाव चे उपोषण स्थगित झाले असल्याने आम्हीही आमचे लाक्षणिक उपोषण स्थगित करीत आहोत.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आमचे अनेक राजपूत समाज बांधव भामटा राजपूत जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित असल्याने आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी शासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन राजपूत समाजास योग्य न्याय मिळण्यासाठी आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात .यासंदर्भात लवकर निर्णय न झाल्यास आम्ही नाईलाजाने आमरण उपोषणाचा निर्णय घेणार असल्याचा इशाराही यात देण्यात आला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मा.तहसीलदार,अमळनेर व
मा. पोलीस निरीक्षक अमळनेर यांनाही देण्यात आल्या.यावेळी राजपुत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील,नरेंद्रसिंह ठाकूर,अनिल पाटील,राजेंद्रसिंह परदेशी,ऍड दीपेन परमार,चेतन राजपूत,ऍड कच्छवा,रणजितसिंग राजपूत, सावन राजपूत, मुकेश परदेशी,प्रकाश परदेशी,जयसिंग पाटील,अजयसिंग पाटील,संदीप राजपूत,मच्छीन्द्र पाटील,प्रभाकर पाटील यासह समाजबांधव उपस्थित होते.