तर टोलनाके जाळून टाकू!
राज ठाकरे यांचा इशारा.

24प्राईम न्युज 10 Oct 2023 टोल वसुली हा महाराष्ट्रातला मोठा स्कॅम आहे.चारचाकी वाहने आणि छोट्या गाड्यांना टोल नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. या प्रकरणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांचे उत्तर काय येते, ते पाहू. नाही तर फडणवीस यांनी सांगितल्यानुसार जर छोट्या. वाहनांना टोल नसेल तर माझे मनसैनिक प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील. याला विरोध झाला तर टोलनाके जाळून टाकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. टोलबाबत विविध राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्या व्हिडिओ देखील राज ठाकरे यांनी दाखविले. मुलुंडचां टोलनाका पेटवून दिला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी मुलुंडचा पहिला टोलनाका पेटवून दिला. टोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिला.