मनसे कामगार सेनेच्या प्रदेश. कार्यकारीनिवर विशाल सोनार यांची निवड.

एरंडोल( प्रतिनिधि )एरंडोल येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल रवींद्र सोनार यांची मनसे कामगार सेनेच्या.महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली असून मुंबई दादर येथील एका छोटेखानी कार्यक्रमा प्रसंगी मनसेचे नेते व प्रवक्ते तथा माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी.मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष. मनोज चव्हाण मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष धुरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी विशाल सोनार यांचे नियुक्ती बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी एरंडोल तालुका उपाध्यक्ष निंबा खंडू पाटील, (विखरण) शहर उपाध्यक्ष जगदीश सुतार, प्रदीप पाटील, यांची उपस्थिती होती.