श्रीक्षेत्र पद्मालय येथे अंगारकीला एक लाख पेक्षा अधिक भाविकांनी लावली हजेरी

एरंडोल(प्रतिनिधी) मंगळवारी 10 जानेवारी २०२३ रोजी श्री क्षेत्र पद्मालय येथे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली भल्या पहाटे . धर्मदाय उपायुक्त गाडे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त एडवोकेट आनंदराव पाटील गोकुळ देशमुख भाऊसाहेब कोळी डॉक्टर पांडुरंग पिंगळे भिका महाजन राजेश तिवारी आदी उपस्थित होते.
भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था व संघटनांतर्फे गुळाचा चहा केळी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती कासोदा व तळई तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, डॉक्टर पी जी पिंगळे, यांनी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली सेवाभावी डॉक्टर उदय तल्हार यांनी आयोजित केलेल्या शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्काळ दर्शनाची सुविधा होती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, गणेश अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख, बंदोबस्त ठेवला एरंडोल पाचोरा जळगाव बस आगारांतर्फे बस सेवा पुरवण्यात आली.
सदर यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्विश्वस्त मंडळांनी परिश्रम घेतले.