एरंडोल येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले.

एरंडोल (प्रतिनिधी)
एरंडोल:-येथील हनुमान नगरा मधून कोणीतरी अज्ञात आरोपीने काहीतरी आमिष दाखवून १६ वर्ष ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची घटना ९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
सदर मुलीला मामाच्या घरून फुस लावून पळून नेल्याची घटना घडली याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशन करीत आहे.