बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक..

अमळनेर (प्रतिनिधी) वसुली साठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी बजाज फायनान्स च्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी घेतलेल्या पर्सनल लोन चा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्स चे कर्मचारि त्यांच्या घरी गेले होते. मात्र पत्नी एकटी घरी असताना वसुली कर्मचाऱ्यांनी दादागिरी केली. आणि अशा अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या म्हणून संतप्त पदाधिकाऱ्यांनी १० रोजी सायंकाळी न्यू प्लॉट भागातील बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील कर्मचारी घाबरून पळून गेले. कार्यालयातील खुर्च्या , टेबल ,संगणक यांची तोडफोड करण्यात आली. याबाबत शाखा व्यवस्थापक विकास सुभाष पाटील यानी फिर्याद दिल्यावरून तोडफोड करण्याऱ्या तिघांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे..