राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे कृत्य करू नये – पो. नि. जयपाल हिरे

0


जळगाव ( प्रतिनिधि) पोळा, गणपती, ईद हे सण अत्यंत आनंदाने आम्ही सर्वांनी साजरे केले असून नवरात्र महोत्सवात सुद्धा कोणीही राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणता कामा नये अन्यथा त्यांच्

यावर कडक कारवाई करणे करण्यात येईल असा इशारा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिला.
नवरात्रनिमित्त एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नवरात्र साजरे करणारे मंडलाचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजाचे प्रमुखांची उपस्थिती होती.

दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी गाणी अथवा नाटक, ड्रामे किंवा नाच गाणे करू नये व इतर धर्मियांच्या भावनांचा अनादर होणार नाही याची दखल घ्यावी असे आवाहन सुद्धा जयपाल हिरे यांनी उपस्थितांना केले.

घटनाबाह्य व सर्व धर्म समभावाला छेद करू नका – फारुक शेख

जात, पंथ, धर्म किंवा लिंग काही असले तरी एकता बंधुता आणि सामाजिक एकात्मतेची भावना देशातील समुदाय आणि समाज आहे या राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक हा तरुण आहे आणि इतर जाती किंवा धर्माबद्दल सहिष्णुता आणि आदर देखील राष्ट्रीय अखंडतेला चालना देण्यासाठी समर्थन देते म्हणून कोणी मूर्ती पूजा करतात तर कोणी करीत नाही पण कुठलाही धर्म दुसऱ्यांवर आक्रमण करायला सांगत नाही.
धर्म म्हणजे कर्तव्य आपण आपले कर्तव्य पार पाडताना दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही असे भाव पूर्ण आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी या सभेत केले
सभेत यांचा होता सहभाग
प्रशांत नाईक, शेख अहमद हुसेन सर, फारुख शेख अब्दुल्ला मनियार बिरादरी जिल्हा अध्यक्ष, गणेश भागवत पाटील,रियाज वजीर काकर, पंडित जंगलु हटकर, रागीब अहमद,राजेंद्र घुगे पाटील,इमाम भाया,सलीम इनामदार, रऊफ खान लुकमान खान, अश्रफखान रशीद खान, खुशाल रमेश झुंजारराव, शांताराम सूर्यवंशी, संजय ठाकरे, सलीम मिया लाला पटेल, योगेश्वर एकनाथ कोळी, राहुल लष्करे, प्रदीप पाटील,बरकत तडवी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास बोरसे यांनी मानले.
फोटो
सभेला संभोधताना पो नी जयपाल हिरे व विचार मांडताना फारुक शेख दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!