कपाशीच्या शेतात गांजाची झाडे शेतात पिकवला लाखो रुपयांचा गांजा..
सपोनि भरत मोरे यांची मोठी कारवाई सतरा लाखाचा गांजा जप्त..

सोयगाव, दि.१२.(साईदास पवार).सोयगांव तालुक्यातिल टिटवी येथे
टिटवी शिवारातील कासार शिवडी नावाचे कालिंका देवी डोंगराचे पायथ्याशी

असलेल्या शेत गट क्र 38 मध्ये फर्दापूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व सपोनि भरत मोरे यांनी अचानक या शेतात धाड टाकून आरोपीस अटक केली स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी स्वताच्या शेतात बेकायदेशीर रित्या गांजा वनस्पतीची लागवड जोपासना करून व संवर्धन करून 273 किलो 850 ग्रॅम वजनाचा एकुण किंमत 16,43,100/- रूपये प्रति किलो 6000/- रूपये दराप्रमाणे किंमत अंदाजे एकूण 585 ओली मुळासकट मातीमिश्रीत हिरवी गांजाची झाडे असा एन डी पी एस गुन्ह्याचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला म्हणून स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीसांनी जप्त केली. त्याची किंमत सुमारे १७ लाख रुपये असल्याचे सपनि भरत मोरे यांनी सांगितले. याप्रकरणी शेतकरी सुकलाल धेना जाधव यांच्यावर विविध कलमान्वये 20(a)(b)(1)(2)(B) NDPS ACT. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिटवी गांवातील या गांजा घटनेमुळं खळबळ उडाली आहे. शेतात कपाशी पिकामध्ये गांजाची झाडे पिकवण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकाला व पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावलं उचलत हि कारवाई केली आहे.टिटवी येथील शेतकरी सुकलाल धेना जाधव यांनी गावापासून एक किलोमीटर अंतरावर मौजे टिटवी शिवारातील कासार शिवडी नावाचे कालिंका देवी डोंगराचे पायथ्याशी असलेल्या शेत गट क्र 38
नावाच्या शिवारात कपाशी पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली आहे. संबंधितवर कारवाई करताना फरदापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, सोयगाव तहसीलचे नायब तहसीलदार कृषी खात्याचे कृषी सहाय्यक मानसिंग भोळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अटक करून कारवाई केली आहे कारवाई केली आहे. पुढील तपास फरदापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.यामुळे आता सावळदबारा परिसरात लपून छपून गांजाचे झाडे लावण्यांचे धाबे चांगलेच दणाणले..