एरंडोल पीठ गिरणी मालक-कामगार कार्यकारिणी जाहीर-अध्यक्षपदी सलिम पिंजारी तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील..

एरंडोल( कुंदन ठाकुर) तालूक्यातील पीठ गिरणी मालक आणि कामगारांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सलिम अमिरोद्दीन पिंजारी, उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत मधुकर पाटील यांची तर सचिवपदी दयानंद विठोबा मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एरंडोल येथील एमएसईबीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीप्रसंगी निरंकार सेवा पीठ, मसाला, गिरणी कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांचेसह तालुका आणि परिसरातील पीठ, मसाला, पापड गिरणी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर पीठ गिरणी मालक आणि कामगारांतर्फे विविध प्रश्नांबाबत उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.