स्टॅम्प वेंडर संघटनेचे आमदार व तहसीलदार यांना दिले निवेदन.

एरंडोल ( कुंदन ठाकुर)नवीन प्रशासकीय इमरात मध्ये बैठक व्यवस्था व्हावी मागणी. एरंडोल – एरंडोल तहसीलदार कार्यालय चे नवीन प्रशासकीय इमारतचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. त्या इमारती मध्ये एरंडोल तहसीलदार कार्यालय आवारातील मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक यांना बसण्यासाठी स्वातंत्र बैठक व्यवस्था करण्यात यावी. यासाठी आमदार चिमणराव पाटील., तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या वेळी स्टॅम्प वेंडर योगेश पाटील, किशोर चौधरी, पांडुरंग मोरे, शालिकराम पवार, योगराज ठाकूर, साहेबराव पानपाटील, अशोक ब्राहमे, हिरामण चव्हाण, आदी उपस्थित होते.