आता मुली होतील लखपती शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय..

24 प्राईम न्यूज 13 Oct 2023 राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत महत्त्वाचे ७ निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुलींच्या जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सांगितले की, मुलींच्या जन्मदर वाढीसाठी जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात सरकारने वाढ केली आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.सरकारच्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ हजार, दुसऱ्या टप्प्यात ६ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात ८ हजार मिळणार आहेत. लेक लाडकी योजना काय आहे? लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारका कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये मिळणार. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये मिळणार. सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये मिळणार. अकरावीत ८ हजार रुपये मिळणार. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मिळणार आहेत. अशारितीने मुलींना १ लाख १ हजार रुपयेमिळतील. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती