पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार?

24 प्राईम न्यूज 15 Oct 2023
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी होण्याची शक्यता आहे, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून १६ किंवा १७ ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाला सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतरमंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाल्याने इतर दोन्ही
पक्षांतील सदस्य, शिवसेना तसेच भाजपमध्ये नाराजी
आहे. शिवाय सरकारी मालकीच्या महामंडळांवरील
नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे पक्षांमध्ये
अस्वस्थता निर्माण झाली आहे.