एअरटेल कंपनीने चांगल्या रस्त्यांची लावली वाट. -ठेकेदाराची मनमानी विना परवाना खोदकाम सुरू.

अमळनेर/प्रतिनिधि
अमळनेर तालुक्यातील शहापूर ते तांदळी या रस्त्यावर फायबर केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने पॉकलँड मशीनने साईडपट्टी कोरत चांगल्या रस्त्याच्या तीनतेरा वाजवले आहेत.
शहापूर ते तांदळी रस्त्याच्या कडेला एअरटेल कंपनीचे फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असून पॉकलँड मशिनच्या माध्यमातून खोदकाम सुरू आहे. मात्र हे काम विनापरवानगी सुरू असून सदर ठेकेदार कोणाचीही तमा न बाळगता मनमानी पद्धतीने खोदकाम सुरू आहे. सां.बा.च्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासून ९ मिटर अंतरावर खोदकाम करणे अपेक्षित असताना सदर ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला चारी खोदत नेली आहे. तसेच पॉकलँड मशीनचा वापर केल्याने रस्त्यावर खड्डे पडत आहेत. त्यामुळे चांगल्या रस्त्याचे तीनतेरा होत असून रहदारीचा रस्ता खराब होत आहे. त्यामुळे तांदळी येथील स्वप्नील परदेशी व कपिल परदेशी यांनी हे काम बंद पाडत संबंधितांकडून परवानगीचे मागितली असता त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी काम बंद पाडले आहे.
प्रतिक्रिया….सदर ठेकेदाराची परवानगी अद्याप प्रतीक्षेत असून रस्त्याच्या कडेला खोदण्याची परवानगी नसून ठेकदराने रस्त्याचे नुकसान केले असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच रस्ता सुस्थितीत करून घेण्यात येणार आहे. :- हेमंत महाजन, उपकार्य. अभियंता, सां.बा. विभाग अमळनेर