शरद पवारांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन यांची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त..

0

24 प्राईम न्यूज 16 Oct 2023 मनी लॉड्रिंग प्रकरणात शरद पवार यांचे निकटवर्तीय, राष्ट्रवादीचे माजी राज्यसभा सदस्य ईश्वरलाल शंकरलाल जैन आणि त्यांचा मुलगा मनीष जैन लालवानी यांच्या ३१५.६० कोटी रुपयांच्या ७० स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या आहेत. जैन यांच्यावर बँक फसवणुकीचा आरोप आहे.जंगम आणि स्थावर मालमत्तेमध्ये जैन यांनी भारतीय स्टेट बँकेची ३५२.४९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कर तीन तक्रारी सीबीआयने नोंदवल्या आहेत. यात प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणिइतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा
समावेश आहे. ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित मुंबई, ठाणे, जळगाव, सिल्लोड आणि गुजरातच्या कच्छमधील
पवनचक्क्या, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने तसेच रोकड अशा ३१५.६० कोटी रुपयांसह ७० मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!