नाकाबंदी दरम्यान सोयगाव पोलिसांची मोठी कार्यवाही.
-दरोड्याच्या तयारीला असलेले सात पैकी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या..

0


साईदास पवार…
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी रात्री नाकाबंदी करताना एक संशयरित्या चारचाकी बोरोले (MH४७A३२०८) गाडी पोलिसाच्या निदर्शनास आली असता रविवारी रात्री ०वाजुन१०मिनिटाने गाडी उभे केली असता गाडीची झडाझडती घेत असताना गाडी मध्ये दोन तलवारी, एक जिवत गावठी कट्टा,दोन लोखंडी राहड,एक दोरी, एक मोबाईल गाडीतून हस्तगत करीत असताना गाडीतील सात पैकी सहा आरोपी फरार झाले तर गाडीच्या ड्रायव्हर पकडून आहे.
रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करण्यात येत असता चारचाकी बोरोले गाडी संशयरित्या आढळून आले असताना सदर आरोपी दरोडेखोर दरोडा चा उदिशेने जात होते पोलिसाच्या वतीने थाबविण्यात आले असता पोलीसाना पाहताच गाडीतून सात पैकी सहा इसम तात्काळ फरार झाले तर एक आरोपीला पकडण्यास सोयगाव पोलिसांना यश आले.गाडीची झडाझडती घेतली असता गाडीतून दोन तलवारी एक जिवत गावठी कट्टा, दोरी,दोन लोखंडी राहाड एकुण दहा लाख ४५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस कर्मचारी अजय कोळी यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामे शुभम बाळासाहेब भालेराव वय (२५)रा देवगाव रंगारी (ह मु पडेगाव) यांच्या वर भा द वी ३९९,४०२,शस्त्र अधिनियम३,२५.४,२५ कलमानुसार कार्यवाही करण्यात आली असुन पोलिस प्रशासनाच्या वतीने गाडीतील सहा फरार इसमाचा शोध रात्रीभर घेतला असता रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत फरार होण्यास यशस्वी झाले तर हातात सापडलेल्या
आरोपीला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सिल्लोड येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,राजु बरडे,मिज्जा,अजय कोळी,नारायण खोडे,रविंद्र तायडे, विनायक सोनवणे, यांनी केली.
चौकट. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी ला मुद्देमालासह अटक करण्यात आले असल्याचे माहिती मिळताच सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कोल्हो यांनी सर्व माहिती जानुन घेत फरार इसमास लवकरच अटक करण्याच्या सुचना दिले.
फोटोओळ, पोलिसांनी पकडलेली बोरोले गाडी, सोबत दोन तलवार, एक गावठी कट्टा, दोरी,मोबाईल खाली बसलेला आरोपी तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कोल्हो, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार पोलिस कर्मचारी. फोटो(२)बोरोले गाडी ..छायाचित्र रविंद्र काटोले सोयगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!