ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आजपासून दोन टेबलवर अर्ज. -स्वीकृती- ;माळेगाव( पिंपरी)ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक-थेट जनतेतून सरपंच “निवड”

0


सोयगाव, ता.१५..(साईदास पवार)…सोयगाव तालुक्यात तीन ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी पोट निवडणूक आणि माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणूक साठी सोमवारी( ता.१६) पासून दोन टेबलवर उमेदवारी अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे दरम्यान माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत साठी ऑनलाइन तर कवली,डाभा आणि गलवाडा या तीन ग्रामपंचायत च्या चार जागांच्या पोट निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज (ता.२०) पर्यंत स्वीकृत केले जाणार आहे
माळेगाव (पिंपरी) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असून सात सदस्यांसाठी निवडणूक होत आहे त्याच सोबत कवली दोन जागांसाठी व डाभा व गलवाडा ग्रामपंचायत च्या प्रत्येकी एक जागेसाठी पोट निवडनुक होत आहे
सोयगाव तालुक्यात मुदत संपलेल्या माळेगाव पिंपरी या एका ग्रामपंचायत साठी सरपंच पदासह सात सदस्यांच्या निवडी साठी सार्वत्रिक होत आहे त्यासाठी सोमवारी (ता.१६) ऑक्टोबर ते शुक्रवारी (ता.२०) ऑक्टोबर पर्यंत दोन टेबलवर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येत आहे (.ता.२३) ऑक्टोबर नामनिर्देशन पात्रांची छाननी व उमेदवारी अर्ज माघारी साठी बुधवार (ता.२५) ऑक्टोबर अंतिम मुदत आहे यामध्ये कवली ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र तीन मध्ये दोन जागा डाभा ग्रामपंचायत साठी प्रभाग क्र दोन साठी एक जागा व गलवाडा ग्रामपंचायत साठी एक जागा अशा चार जागांसाठी पोट निवडणूक होत आहे त्यामुळे माळेगाव पिंपरी सार्वत्रिक आणि तीन ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी पोट निवडणूक होत असून( ता.०५) नोव्हेंबर ला मतदान होत आहे
—-माळेगाव पिंपरी ग्रामपंचायत साठी सात सदस्य आणि एक सरपंच अशा आठ जागांसाठी मतदान होणार आहे दरम्यान माळेगाव पिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आहे सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार आहे या आधीही मागील पंचवार्षिक निवडणुकीत या ग्रामपंचायत साठी थेट जनतेतून सरपंच निवड झाली होती परंतु त्यानंतर ही पद्धत बदलली व पुन्हा शासनाने तोच निर्णय घेतल्याने माळेगाव पिंपरी ग्रामपंचायत साठी सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत दुसऱ्यांदा थेट जनतेतून सरपंच निवड होत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!