शंभर फुटी रोड लब्बैक हॉस्पिटल परिसरात नया कदम संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

धुळे/अनीस खाटीक
धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात नया कदम या संस्थेच्या वतीने लब्बैक हॉस्पिटल परिसरात विशेष करून गोरगरीब महिल आणि आभाल वृद्धांसाठी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात गुदविकार,पाईल्स, पोटाचे विकार,अपेंडिक्स, मूतखडा, पित्ताशयातील खडे, अल्सर, जीर्ण जखमा, व्हेरिकोज व्हेन, स्तनांच्या व इतर अवयवातील गाठी, हर्निया इत्यादी विकारांची मोफत तपासणी करून उपचारासाठी सल्ला देण्यात आला. या शिबिरात महिला रोग तज्ञ डॉक्टरांसह अनेक डॉक्टरांनी महिलांची तसेच परिसरातील नागरिकांची तपासणी केली. लब्बैक हॉस्पिटलच्या सहकार्याने आणि नया कदम या संस्थेच्या वतीने हे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावून उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे.
यावेळी परिसरातील अनेक गोरगरीब गरजू महिलांनी तसेच परिसरातील आभाळ वृद्धांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी अख्तर हसन मोहम्मद शाबान अन्सारी, (अध्यक्ष) जाविद मोहम्मद मुश्तूफा अन्सारी, (उपअध्यक्ष) नासिर हुसेन मोहम्मद शाबान अन्सारी,(सचिव) मुश्ताक अहमद अय्यूब,(सेक्रेटरी) जाकीर शाबान अन्सारी,(खजिनदार) मोहम्मद कलीम हमीद अन्सारी,(सदस्य)शोएब अहमद निसार आमद अन्सारी,व लब्बैक हॉस्पिटलचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नया कदम या संस्थेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.