मंदीचे सावट,गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बाजारात निरुत्साह..

अमळनेर /प्रतिनिधि अमळनेर यावर्षी तालुक्यात एकूण ८३ नवरात्र मंडळे असून मोठ्या मूर्त्याना मागणी नाही. लहान मूर्त्याना जास्त मागणी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बाजारात निरुत्साह दिसून आला.
घरोघरी घट स्थापनेसाठी महिलांची लगबग सुरू होती. बाजारात घट साठी मातीची घागर , बांबू टोपली , उद दाणी , दिवा ,पणती , देवी मूर्ती , हिरवा चुडा , विड्याची पाने , खारीक खोबरे , सुपारी , बदाम ,ओटी ,खण , नारळ , कापूर ,अगरबत्ती , उद , चुनरी , गरबासाठी टिपऱ्या , रांगोळी ,रंग , फुलहार यांची दुकाने सजली होती.
नवरात्र च्या शुभमुहूर्तावर वाहन , इलेकट्रॉनिक्स वस्तू घेण्यासाठी यावर्षी गर्दी नाही. बाजारात मंदी दिसून आली.
शहरात ६१ मंडळे तर ग्रामीण भागात २२ मंडळे आहेत. त्यात खाजगी १२ मंडळे आहेत. विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक एस आर पी , दोन आर सी पी प्लाटू न , ५० होमगार्ड तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.