एरंडोल एस टी आगारात अपघात सुरक्षितता अभियानाचे उदघाटन तहसीलदार सुचिता चव्हाण यांचे हस्ते उदघाटन संपन्न…

एरंडोल(प्रतिनिधी) दरवर्षी महामंडळा तर्फे सर्व विभागातील सर्व आगारामध्ये जानेवारी महिन्यात अपघात सुरक्षितता अभियान राबविले जाते त्यानुसार यावर्षी देखील एरंडोल आगारात राबविण्यात येणाऱ्या सुरक्षितता अभियानाचे उदघाटन आज दि 11 जानेवारी रोजी तालुक्याच्या तहसीलदार सुचिता चव्हाण मॅडम यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पो नि ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख विजय पाटील होते तर व्यासपीठावर स्थानक प्रमुख गोविंदा बागुल ,सहा कार्यशाळा अधीक्षक भारती बागले उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आगाराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रस्ताविकातून वाहक किशोर मोराणकर यांनी सुरक्षितता अभियानाचा उद्देश सांगत प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील एस टी बस चे महत्व विषद केले यानंतर सुचिता चव्हाण मॅडम यांनी आपल्या आयुष्यातील एस टी चे अनुभव सांगत सर्व एस टी कर्मचारी बांधवानी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपली वेशभूषा व व्यक्तिमत्वाला प्राधान्य देण्याचे सांगितले तर पो नि ज्ञानेश्वर जाधव यांनी रापम बसने प्रवास करीत असतानाचा आनंद हा खप आगळा वेगळा असल्याचे सांगत अपघात सुरक्षितता ही आजच्या काळाची गरज असून त्यासाठी चालकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी उपस्थित कर्मचारी बांधवांना प्रवाशांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करीत एस टी कधीही नफा तोट्याचा विचार न करता प्रवाशी व विद्यार्थी सेवेला प्राधान्य देत असल्याचे सांगत इतर वाहतुकीच्या तुलनेत एस टी चे अपघाताचे प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगून त्याचे सारे श्रेय माझ्या सर्व कर्मचारी बांधवांचे असल्याचे सांगितले ,याप्रसंगी गेल्या महिन्यात सर्वाधिक उत्पन्नात राज्यात जळगांव विभागाचा प्रथम क्रमांक आल्याने विभाग नियंत्रक भगवान जगनोर साहेब यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच सलग 25 वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या चालक ए बी शिंदे यांचा व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगिरी करणाऱ्या जळगांव विभाग क्रिकेट टीमचा खेळाडू स्वप्नील भोलाने याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाहक किशोर मोराणकर यांनी केले यावेळी रापम चालक,वाहक ,यांत्रिक कर्मचारी ,विद्यार्थी ,तसेच रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते