इसराइल ने त्वरित युद्ध बंदी करून मस्जिद- ए- अक्सा चा ताबा सोडावा – एकमुखी मागणी

जळगाव ( प्रतिनिधि )
प्लॅस्टिन – गाजावर इस्राईल ने सुरू केलेल्या युद्धामुळे लहान मुले, महिला,वृद्ध व नागरी वस्तीतील लोकांची जीवित हानी होत असून जे जिवंत आहे त्यांना पाणी, इलेक्ट्रिकल सप्लाय, इंधन, औषध पुरवठा, अन्नपुरवठा बंद असल्याने उपासमारीची वेळ आली
आहे.
इस्राईल ने त्वरित युद्धबंदी करावी तसेच मस्जिद ए अक्सा चा जो अनधिकृतपणे ताबा
घेतलेला आहे तो त्वरित सोडण्यात यावा यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताने आवाज उठवावा या मागणीसाठी जळगाव शहरातील शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याद्वारे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्व, प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
सदरचे निवेदन एस डी एफ आय चे अध्यक्ष मौलाना कासिम नदवी, अल्पसंख्यांक महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष मजहर पठाण, एम आय एम पार्टीचे अध्यक्ष अहमद सर, मुस्लिम ईदगाह सचिव अनिस शाह, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, शिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, राष्ट्रीय काँग्रेस महानगर अध्यक्ष अल्पसंख्यांक अमजद पठाण, बी वाय एफ चे अध्यक्ष शिबान फाईज, राष्ट्रवादी चे मतीन शब्बीर , पत्रकार फारुक शाह, अडावद,जफर शेख नशिराबाद, कमर रजा पाचोरा, कासिम उमर, मुजाहिद खान, वसीम शाह, जुलकर नैन, असलम पटेल आदींची उपस्थिती होते..