स्वर्गीय बाबुरावजी काळे यांनी सामान्य कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे काम केले. – मा. किसन जेठे
-कै. बाबुरावजी काळे स्मृती दिन कार्यक्रम संपन्न

सोयगाव / साईदास पवार
सोयगाव ता …१८.. स्वर्गीय बाबुरावजी काळे यांनी सर्व सामान्य कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक देऊन लढण्याचे शिकवले, मंत्री असतांना त्यांनी अनेक शेतकरी, शेतमजूर व कामगार यांना मदत करून जगण्याचा आधार दिला. अनेक सामान्य कार्यकर्त्याला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सचिव मा. किसनराव जेठे यांनी मांडले. ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे आयोजित कै. बाबुरावजी काळे स्मृती दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रंगनाथनाना काळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर पत्रकार श्री शिवनाथ राठी, माजी नगरसेवक शांतीलाल अग्रवाल, महाराष्ट्र रेल्वे परिषद अध्यक्ष श्री विलासचंद्र काबरा, श्री अंबादास खर्डेकर, श्री इंद्रजित सोळंके, श्री रवींद्र काळे, भाऊराव पाटील लोखंडे, चून्नीलाला चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर डॉ दिलीप बिरुटे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे यांनी आभार मानले.
डॉ राजेश यादव, डॉ सी यु भोरे, डॉ रामेश्वर मगर, डॉ उल्हास पाटील, ज्ञानेश्वर एलिस, डॉ विक्रम भुतेकर, डॉ संतोष तांदळे, डॉ निलेश गावडे आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी सोयगाव तालुक्यातील सामान्य कार्यकर्ते, शेतकरी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.