आज सोयगाव तहसील कार्यालय येथे धनगर समाजाचा धडक मोर्चा.

सोयगाव / साईदास पवार
सोयगाव दि. १८.. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील धनगर समाज व मल्हार सेनेच्या वतीने सोयगाव तहसील कार्यालय येथे ‘धडक मोर्चा’ काढण्यात येणार आहे. ही माहिती मोर्चाचे आयोजक नाना साबळे यांनी दिली. धनगर समाजाचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. हा संताप व्यक्त करण्यासाठी व आरक्षण प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाला मार्गदर्शक म्हणून लहूजी शेवाळे, सुनिलजी दुधे, शिवाजीराव बुढाळ, प्रा. गोविंद भोजने, नाना साबळे, शिवाजी काटकर, कारभारी दांगोडे हे लाभणार असून प्रमुख उपस्थिती राजेंद्र राठोड शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा), संघपाल सोनवणे, ह.भ.प. नामदेव पलाळ, यांची राहणार आहे. मोर्चेची सुरवात सकाळी दि. १९ गुरवार रोजी सकाळी १० वाजता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून धडक मोर्चेला सुरवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालय येथे मोर्चा धडकणार आहे. या मोर्चेला हजारो समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे आयोजक नाना साबळे यांनी सांगितले.