‘त्या’ जमीन प्रकरणाशी माझा संबंध नाही.. अजित पवार.

24 प्राईम न्यूज 18 Oct 2023 पुण्यातील येरवडा येथील पोलीस खात्याचा भूखंड बांधा, वापरा आणि हस्तांतरित या तत्त्वावर विकसित करण्यात येणार होता. जागेची किंमत तीन कोटी असताना सरकारला १५ कोटी रुपयांचा फायदा होणार होता, मात्र पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी जमीन हस्तांतरित करण्यास नकार दिलात्यांनी दिलेल्या नकारानंतर मी त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. या जमीन प्रकरणाशी संबंधित कोणत्याही बैठकीला मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे या प्रकरणाचा माझ्याशी अर्थाअर्थी संबंध नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. निवृत्त पोलीस
अधिकारी मीराबोरवणकर यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्याचवेळी पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी कधी कधी अशा खळबळजनक गोष्टी केल्या जातात, असा टोलाही पवार यांनी लगावला.