असोदा येथील जळीत घरातील खाटीक कुटुंबीयां साठी मनियार बिरादरी सरसावली..
संसारिक वस्तू व रोख रक्कम भेट..

0

जळगाव/ प्रतिनिधि

असोदा येथील खाटीक बिरादरी चे सत्तार हैदर खाटीक यांच्या घरी मध्य रात्री शॉर्ट सर्किट मुळे आग लागून संपूर्ण घर व घरातील वस्तू जळून खाक झाले.जे नुकसान झाले ते काही प्रमाणात भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरी ने प्रत्यक्ष असोदा येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली कुटुंबीयांना आपला संसार चालवण्यासाठी गॅस शेगडी, मिक्सर, किचन वस्तू सेट, दोघं पती पत्नीला कपडे, कपडे व वस्तू ठेवण्यासाठी मोठी लोखंडी पेटी, सह रोख रक्कम दोन हजार रुपये देण्यात आले.

याप्रसंगी बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख यांनी कुटुंबीयांना धीर दिला व तुमच्या दुःखात आम्ही सहभागी असून आपणास जी काही मदत लागेल ती आम्ही आमच्या इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण करू असे आश्वासन दिले.

या शिष्ट मंडळात फारुक शेख सह वहिदत इस्लामी चे अध्यक्ष अतिकं अहमद, कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद,मण्यार बिरादरीचे शहर अध्यक्ष अब्दुल रउफ रहीम, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, मरकज फाउंडेशनचे रईस टिल्लू आदी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांमध्ये हाजी सलीम, अब्दुल वाहिद, गफार खाटीक, गुलाब नादर, बबलू गुलाब, साजिद गफार व संजीव गफार यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!